*१९५१ नंतर पहिल्यांदा घडले
नवी दिल्ली- सर्वसाधारणपणे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून
गुलाबी थंडी सुरू होते, मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यात थंडी ऐवजी तापमानाने विशेष विक्रम केला आहे. हवामान खात्याने सांगितले की,यावर्षीचा ऑक्टोबर हा देशातील आतापर्यंतचा सर्वांत उष्ण महिना ठरला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की,ऑक्टोबरमध्ये सरासरी तापमान २६.९२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे १९०१ नंतरचे सर्वात उष्ण तापमान आहे, तर सामान्य तापमान २५.६९ अंश सेल्सिअस आहे.संपूर्ण देशात २०.०१ अंश सेल्सिअसच्या सामान्य तापमानाच्या तुलनेत किमान तापमान २१.८५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.दिल्लीत ऑक्टोबरचे सरासरी तापमान ३५.१ होते.दिल्लीने ऑक्टोबरमधील उष्णतेचा गेल्या ७३ वर्षांचा विक्रम मोडला आहे. दिल्लीच्या सफदरजंग हवामान केंद्राच्या मते,१९५१ नंतरचा ऑक्टोबर हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे.यावर्षी ऑक्टोबरमध्ये राजधानीचे कमाल तापमान ३५.१ अंश सेल्सिअस होते.यापूर्वी १९५१ मध्ये सर्वाधिक तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.