म्हाडाच्या लॉटरीत डोमेसाईलची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीत डोमेसाईलची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीत अपयशी ठरणाऱ्या नागरिकांना अर्ज करण्याची आणखी एक संधी कोकण मंडळामार्फत देण्यात येणार आहे. त्यानुसार कोकण मंडळाने लॉटरीची तयारी सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. मंडळामार्फत दोन सोडती काढणार आहेत. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या लॉटरीची जाहिरात ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये खासगी बिल्डरांकडून म्हाडाला प्राप्त झालेल्या ९१३ घरांचा समावेश करण्यात आला आहे.

या लॉटरीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी अर्ज भरतेवेळी डोमेसाईल सर्टिफिकेटशिवाय अर्ज करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव मंडळाने म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. त्यामध्ये विजेत्याने लॉटरीनंतर डोमेसाईल प्रमाणपत्र मंडळाला सादर करण्यास परवानगी देण्याचे नमूद केले आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्जदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही अट करतेवेळी शिथिल केल्यास मोठ्या संख्येने अर्ज येतील, असा विश्वास मंडळातील अधिकाऱ्यांना आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top