नाशिक – मौनी अमावस्येनिमित्त आज रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या अमावस्येला हिंदू धर्मात महत्त्व आहे. दरवर्षी माघ महिन्यात हा स्नानाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी नदी संगमावर पितरांना पिंडदान आणि तर्पण देण्याची परंपरा आहे. तसेच, यावेळी त्रिवेणी योगासह शुभ योग एकत्र आल्याने मौनी अमावस्येचे महत्त्व वाढले. याशिवाय प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभाचे दुसरे शाही स्नानदेखील आज संपन्न झाले. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड व त्रिवेणी संगम परिसरात पहाटेपासून भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती.या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करून भाविकांना सतर्कतेच इशारा दिला होता.
मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची गर्दी
