मोरबे धरणातील गाळ २५ वर्षांपासून साचून

नवी मुंबई- नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता गेल्या २५ वर्षांपासून गाळ न काढल्याने कमी होत चालली आहे.तसेच या धरणाचे निर्जंतुकीकरणही केले जात नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नॅटकनेक्टचे संचालक बी.एन.कुमार यांनी दिली.

नॅटकनेक्टचे संचालक बी.एन.कुमार यांनी सांगितले की,पावसाळ्यात धरणे आणि तलाव ओव्हरफ्लो होताना दिसली तरी एप्रिल-मे पासून पाणीकपात होणार आहे.आम्ही नवी महापालिकेकडून विविध जलसाठ्यात केलेल्या निर्जंतुकीकरणाविषयी तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी गेल्या १० वर्षांत विहार,तुळशी, मोडक सागर,तानसा आणि मध्य वैतरणा येथे अजिबात निर्जंतुकीकरण झाले नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले.
नवी मुंबईच्या मालकीचे असलेल्या मोरबे धरणातून नवी मुंबई शहराला दररोज ४५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.हे धरण पालिकेच्या ताब्यात दिल्यापासून या धरणातून कधीही विसर्ग झालेला नाही.म्हणजेच या धरणात जेमतेम पाणीसाठा असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top