वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीला भेट देणार आहेत. त्यानंतर पोहरादेवी इथे असलेल्या नंगारा वस्तूसंग्रहालयाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील काही महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.
मोदी २६ सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर
