मोदींवर वादग्रस्त वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री गोवा दौऱ्यावर

इस्लामाबाद : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असल्याचे पाकिस्तानने गुरुवारी सांगितले. ते गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी येत आहेत. बिलावल भुट्टो झरदारी हे ४-५ मे रोजी गोव्यात होणाऱ्या एससीओ परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करनारा असल्याचे, परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज बलोच यांनी साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले. डिसेंबर २०२२ मध्ये पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली होती.

.यंदाचे २०२२-२३चे एससीओ समिटचे आयोजन भारताकडे असून यामध्ये सर्व देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहतील अशी भारताला आशा आहे.यापूर्वी हिना रब्बानी खार या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री २०११ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर पाकिस्ताननं एससीओ समिटचे भारताचे निमंत्रण जानेवारीत स्विकारले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मार्फत इस्लामाबादमधील भारतीय दुतावासामार्फत हे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यानुसार आता ते गोव्यात होणाऱ्या समिटमध्ये सहभागी होणार आहेत. २०१४ मध्ये नवाझ शरीफ यांच्यानंतर पाकिस्तानी नेत्याची झरदारी यांची पहिलीच भारत भेट असेल.

फेब्रुवारी २०१९ मध्ये, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून नवी दिल्लीने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गंभीरपणे ताणले गेले. भारताने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विशेष अधिकार मागे घेण्याची आणि राज्याचे केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केल्यानंतर संबंध आणखी बिघडले. त्यांनतर डिसेंबर २०२२ मध्ये पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, ‘मला भारताला सांगायचे आहे की ओसामा बिन लादेन मेला आहे, पण ‘गुजरातचा कसाई’ अजूनही जिवंत आहे आणि भारताचे पंतप्रधान भारताचे परराष्ट्र मंत्री ९/११ चा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनला पाकिस्तान आश्रय देतो, असे म्हटले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top