वॉशिंग्टन – एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे नाटो देशांच्या बैठकीचे आयोजन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया दौऱ्यासाठी निवडलेली वेळ आणि त्यातून देण्यात आलेल्या संदेशामुळे अमेरिकेच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकी काँग्रेसमध्ये भारत व रशियातील वाढत्या जवळीकीबद्दलही खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे.
याबाबत आम्ही भारताशी याबाबत चर्चा करत आहोत, अशी माहिती अमेरिकेचे दक्षिण व मध्य आशियासाठीचे साहाय्यक परराष्ट्रमंत्री डोनाल्ड लू यांनी अमेरिकेच्या खासदारांना मंगळवारी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी जी-७ देशांच्या परिषदेदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली होती.तसेच रशिया भेटीत मोदी यांनी सर्व माध्यमांसमक्ष ‘युद्ध हा पर्याय नसल्याचे व युद्धात बळी गेलेल्या मुलांबद्दल दुःख झाल्याचे’ पुतीन यांना सांगितले.याची आठवणही लू यांनी अमेरिकी काँग्रेसला करून दिली.खा, जो विल्सन यांनी मोदींच्या रशिया दौऱ्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या रशिया दौऱ्यावर आम्ही लक्ष ठेवून होतो.या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियादरम्यान कोणतेही मोठे संरक्षण करार झालेले नाहीत,असे डोनाल्ड लू यांनी सांगितले.