मोदींच्या ‘मन की बात’ची रविवारी शंभरी भाजपकडून विशेष कार्यक्रमाची तयारी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला होता. त्याला देशवासियांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. येत्या रविवारी ‘मन की बात’चा शंभरावा भाग सादर होणार आहे. त्यानिमित्ताने भाजपने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंगळवारी सायंकाळी खासदारांना याची माहिती दिली. ते म्हणाले, हा भाग मोदी सरकारने केलेली विकासकामे व अंमलबजावणीची माहिती तसेच प्रस्तावित योजनांची माहिती देणारा असेल. त्याची अधिकाधिक लोकांना माहिती व्हावी म्हणून प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. प्रत्येक आमदारास त्यांच्या क्षेत्रातील शंभर बूथवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी किमान शंभर नागरिक उपस्थित असलेच पाहिजे. प्रक्षेपण टी. व्ही., एल.सी.डी. व अन्य माध्यमातून झाले पाहिजे. अकरा वाजता होणार्‍या या कार्यक्रमापूर्वी भजन, भाषण, रांगोळी स्पर्धा किंवा तत्सम कार्यक्रम घेणे अपेक्षित आहे. खासदारांना त्यांच्या मतदारसंघांपैकी कुठेही एका ठिकाणी उपस्थित राहून प्रक्षेपण करण्यात येईल. त्यावेळी हजर राहणे अपेक्षित आहे. मात्र इथे किमान एक हजार लोकांची उपस्थिती अनिवार्य आहे. उपस्थित लोकांसाठी उद्बोधनात्मक कार्यक्रम ठेवण्याची सूचना आहे. याच कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी हे शंभर रुपयाच्या नाण्याचे लोकार्पण एक खास आठवण म्हणून करणार आहेत. संघटन मंत्री अविनाश देव म्हणाले की, कार्यक्रम प्रसारणापूर्वी विविध कार्यक्रम घेण्याची मुभा आहे.

आमिर खान, रवीनाची उपस्थिती

दिल्लीच्या विज्ञान भवनात रविवारी होणार्‍या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील 100 मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री रवीना टंडन यांचाही समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top