मुंबई- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून महायुतीचा विजय झाला आहे. पण मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ असा निर्धार ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकून आदित्य ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत तुमच्या पाठिंब्यासाठी आणि आशिर्वादासाठी धन्यवाद. अनेकांचे आभार मानणे मला शक्य झाले नाही त्याबद्दल माफी. ही निवडणूक विश्लेषणापलीकडची होती आणि त्यात जनतेचा जो आशीर्वाद मिळाला तो उत्साह देणारा आहे. आम्ही पुन्हा उभारी घेऊ, तीही मोठ्या ताकदीने आणि पूर्वी पेक्षा चांगलं सर्वांसाठी महाराष्ट्र उभा करू.