मुंबई – देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज तेजीने झाली.परंतु त्यानंतर बाजारात घसरण झाली. संपूर्ण दिवसातील मोठ्या चढ-उताराअंती बाजार तेजीसह बंद झाला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५६६ अंकांच्या वाढीसह ७६,४०४ अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३० अंकांनी वाढून २३,१५५ अंकांवर बंद झाला. तर बँक निफ्टीमध्ये १५३ अंकांची वाढ होत तो ४८,७२४ अंकावर स्थिरावला.मुंबई शेअर बाजारावर नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल आज घसरून ४२१.९६ लाख कोटी रुपयांवर आले.आदल्या दिवशी मंगळवारी ते ४२४.०७ लाख कोटी रुपये होते. त्यात आज २.११ लाख कोटी रुपयांची घसरण झाली.
मोठ्या चढ-उतारानंतर शेअर बाजार तेजीसह बंद
