मुंबई – गुणरत्न सदावर्ते यांची सनद बार कौन्सिलने दोन वर्षांसाठी रद्द केली. त्याविरोधात सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र याबाबत दाद मागण्यासाठी गेलेल्या सदावर्ते यांना न्यायालयाने मोठ्याने बोलू नका, तुम्ही प्रेससमोर नाही, असे म्हणत फटकारले. सदावर्तेंना तातडीचा दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे आदेश न्यायालयाने सदावर्तेंना दिले.
सदावर्तेंनी एसटी आंदोलनात वकिलांचा पोशाख परिधान करून आझाद मैदानात डान्स केला. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संघटनेने सदावर्तेंवर शिस्तभंगाची कारवाई करत, सदावर्ते यांना दोन वर्षे वकिली करण्यास मज्जाव केला. वकिलांसाठी असलेल्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, कोर्टात सदावर्ते यांची भाषा आक्रमक होती. त्यामुळे कोर्टाने त्यांना खडसावताना म्हटले की, तुम्ही प्रेससमोर नाहीत, तर कोर्टात दाद मागायला आलात याचे भान राखा. न्यायमूर्ती पटेल यांनी त्यांना दोन वेळा समज दिली.
मोठ्याने बोलू नका, तुम्ही प्रेससमोर नाही!