अमरावती – अमरावतीहून धारणी येथे जात असलेली खासगी प्रवासी बस मेळघाटातील सेमाडोहजवळील पुलावरून कोसळून आज सकाळी ४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३६ प्रवासी जखमी झाले. जखमींना सेमाडोह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.चावला ट्रॅव्हल्स कंपनीची बस आज सकाळी ६ वाजता अमरावती येथून धारणीला निघाली होती. सकाळी साडेआठ वाजता सेमाडोह नजीक भूतखोरा परिसरात धोक्याच्या वळणावर असणाऱ्या नदीच्या पुलावर बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस पुलाखाली नदीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बसमधील ४० जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर उपचारादरम्यान जखमींमधील चार जणांचा मृत्यू झाला.
मेळघाटात बस पुलावरून कोसळली ! ४ जणांचा मृत्यू
