मेट्रो ७ आणि मेट्रो २अ ने पार
२ कोटी प्रवाशांचा टप्पा केला

मुंबई – ‘दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर ते गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरून गेल्या वर्षभरात दोन कोटी मुंबईकरांनी प्रवास केला. या दोन्ही मेट्रो मार्गिकांना प्रवाशांकडून पसंती मिळत आहे. सध्या दर दिवशी सरासरी एक लाख ६० हजार प्रवासी या मार्गिकांवरून प्रवास करत आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला होता. त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गिकांचा दुसरा टप्पा १९ जानेवारी २०२३ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यानंतर या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून आता या मार्गिकांना मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचा दावा \’एमएमआरडीए\’ आणि \’महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ\’ने (एमएमएमओसीएल) केला आहे. या दोन्ही मार्गिकांवरून एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या दोन कोटीवर पोहोचली आहे.

Scroll to Top