मुंबई- मुंबईकरांसाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरे कॉलनी दरम्यानचा रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टप्प्यातील ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे,अशी माहिती मिळाली असल्याचे वॉचडॉग फाऊंडेशनचे अॅड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.
वॉचडॉग फाऊंडेशनचे अॅड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे मेट्रो-३ च्या वस्तुस्थितीबाबत माहिती अर्ज दाखल केला होता. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. राज्यात होणार्या आगामी निवडणुकांसाठी लागणार्या आचारसंहितेआधी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ चा काही टप्पा सुरू करण्याचा महायुती सरकारचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे प्रवास सप्टेंबरमध्येच सुरू होणार आहे.या प्रकल्पाचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे.तर दुसर्या टप्प्यातील बीकेसी ते कफ परेड दरम्यानचा पुढील टप्पा फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू होईल,अशी माहिती अॅड.गॉडफ्रे पिमेंटा यांच्या माहिती अर्जाच्या उत्तरात देण्यात आली आहे.