नवी दिल्ली – विद्यार्थ्यांना मेट्रो भाड्यात अनुदान देण्याचा प्रस्ताव आज आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिला. पुढील महिन्याच्या ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना हे पत्र लिहले.
केजरीवाल यांनी पत्रात लिहले की, दिल्लीतील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेट्रोवर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी दिल्ली मेट्रोच्या भाड्यात विद्यार्थ्यांना ५० टक्के अनुदान मिदेण्याचा प्रस्ताव ठेवतो. दिल्ली मेट्रो ही केंद्रसरकार व दिल्ली सरकारची ५० टक्के भागीदारी असलेली संयुक्त योजना आहे. त्यामुळे यावर होणारा खर्च दोन्ही सरकारने विभागून करावा. तसेच, विद्यार्थ्यांना बस सेवा पूर्णतः मोफत देण्याची योजना आम्ही तयार करत आहोत. तुमची या प्रस्तावाला सहमती मिळेल अशी अपेक्षा आहे.
मेट्रो भाड्यात विद्यार्थ्यांना अनुदान देण्याचा केजरीवाल यांचा पंतप्रधान मोदींना प्रस्ताव
