कॅलिफोर्निया
फेसबुक, व्हाट्स ॲप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा पुन्हा एकदा हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. यापूर्वीही मेटाने सुमारे १०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. आता पुन्हा एकदा ही कंपनी कर्मचारी कपात करत असल्याने हजारो कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
मेटा कंपनीने २०२२ च्या अखेरीस ११,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला. जागतिक मंदीची भीती आणि कंपनीच्या महसुलात झालेली घट लक्षात घेऊन नोकरकपात केल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिले. या आठवडाभरात ही नोकरकपात होणार आहे. त्यानुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यादी तयार करण्यास सांगितले.