कॅलिफोर्निया – मेटा कंपनीने आपल्या ३६०० कर्मचाऱ्यांना कमी करण्याची योजना तयार केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका टिप्पणी द्वारे याचे सूतोवाच करण्यात आले आहे.मेटाचे प्रमुख झुकरबर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या टिप्पणीत म्हटले आहे की, आम्हाला मॅनेजमेंटचा स्तर वाढवायचा आहे. जे चांगले काम करणार नाहीत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. मेटा आपल्या ५ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या विचारात आहे. सध्या मेटामधील सर्व कंपन्यांमध्ये मिळून एकूण ७२००० कर्मचारी काम करतात. त्यातील ५ टक्के म्हणजे ३६०० लोकांना कमी केले जाण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्ग ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील ज्या कर्मचाऱ्यांना कमी केले जाईल त्यांना १० फेब्रुवारी रोजी त्यांची माहिती दिली जाणार असून इतर देशांमधील कर्मचाऱ्यांना त्यानंतर सुचित केले जाणार आहे.
मेटाची ३६०० कर्मचारी कमी करण्याची योजना
