कॅलिफोर्निया – फेसबुकची पॅरेन्ट कंपनी मेटाने पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तिसर्या टप्प्यातील कपात आहे. जागतिक स्तरावर 6,000 कर्मचार्यांना यात कामावरून कमी करण्यात येणार आहे. या कपातीचा भारतातील अनेक कर्मचार्यांना फटका बसला आहे. यात वरिष्ठ अधिकार्यांचाही समावेश आहे. भारतातील विपणन संचालक अविनाश पंत, मीडिया भागीदारी संचालक साकेत झा सौरभ आणि मेटा इंडियाच्या कायदेशीर संचालक अमृता मुखर्जी या अधिकार्यांना कंपनीतून काढण्यात आले आहे.
मेटाने बुधवारी कपातीच्या नवीन फेरीला सुरुवात केली. ज्याचा परिणाम जागतिक स्तरावर सुमारे 6,000 कर्मचार्यांवर होणार आहे. तसेच खर्च कमी करण्यासाठी मेटाची पुनर्रचना केली जात आहे. नोकरकपातीच्या या तिसर्या फेरीचा परिणाम मुख्यतः मेटाच्या बिझनेस विभागांवर झाला आहे. मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी कंपनी एप्रिलच्या शेवटी आणि मेच्या सुरुवातीला दोन फेर्यांमध्ये 10,000 नोकर्या कमी करू, अशी कल्पना मार्चमध्येच दिली होती. या जागतिक स्तरावरील कपातीचा फटका मार्केटिंग, अॅडमिनिस्ट्रेशन, ह्यूमन रिसोर्स आणि इतर विभागातील कर्मचार्यांना बसला आहे. भारतात नुकत्याच करण्यात आलेल्या कपातीवर कंपनीकडून अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
’मेटा’ची पुन्हा नोकरकपात वरिष्ठ अधिकार्यांना नारळ
