मेक्सिको सिटी – पाऊस कमी पडल्याने मेक्सिको शहरात पुढील अनेक दिवसांसाठी पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. मेक्सिकोचा राष्ट्रीय जल आयोग आणि शहराचे महापौर यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यानंतर तीन तासांनी तो सोशल मीडियावर जाहीर करण्यात आला.
मेक्सिकोत यंदा पाऊस कमी पडल्याने मेक्सिको खोऱ्यातील २ कोटी लोकांना पाणीपुरवठा करणाऱ्या तीन जलसाठ्यांमधील पाणीपातळीने विक्रमी तळ गाठला आहे. सध्या असायला हवा त्याच्या केवळ ४४ टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच ८ टक्के पाणीकपात करण्यात आली होती. परंतु यावेळी बरीच जास्त म्हणजे २५ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. तिचा फटका शहराच्या पश्चिम भागातील रहिवाशांना बसू शकतो.
नेमकी किती दिवस ही पाणीकपात लागू असेल, हे अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नाही. ती पुढील काही महिने असेल, असे त्यांनी सांगितले आहे. पुढील वर्षी मे महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. तो सरासरी असेल, असा अंदाज आहे. त्यानंतरच जलसाठ्यांतील पाणीपातळी सुधारण्याची शक्यता आहे.
मेक्सिको शहरात पाणीकपात! पावसाअभावी जलसाठे आटले
