वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दोन्ही महत्त्वाचे उमेदवार एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी आपण महाविद्यालयीन काळात मॅकडोनाल्डमध्ये काम केल्याचा दावा केला होता. त्याला आव्हान देत डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्यक्षात तिथे काम केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित केला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पेनिसिल्वेनिया येथील मॅकडोनाल्डमध्ये काम केल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला. इथे काही वेळ त्यांनी सहाय्यक म्हणून काम केले. प्रत्यक्ष काम करतांनाच्या या व्हिडीओ बरोबर त्यांनी एक पोस्टही लिहिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मी या ठिकाणी कमला हॅरिस यांच्यापेक्षा पंधरा मिनिटे अधिक काम केले. कमला हॅरिस यांनी इथे कधीही काम केले नव्हते. त्यामुळे त्यांचा दावा खोटा आहे. या दोन्ही उमेदवारांमधील संघर्ष आता अधिकच तीव्र होणार असून तो राजकीय बरोबरच सामाजिकही झाला आहे.