मुंबई – फसवणुकीप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने 62 वर्षीय आरोपीला त्याच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर वैद्यकीय जामीन मंजूर केला. सुरेश पवार असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करुन त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते.
उपचारांसाठी जेजे रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी सुरेश पवार यांनी वैद्यकीय जामीनासाठी अर्ज केला होता. जामीन अर्जावर 4 मे 2023 रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला वैद्यकीय कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश दिले आणि प्रकरण 6 मे रोजी सुनावणीसाठी ठेवले. 6 मे रोजी तपास अधिकारी आजारपणाच्या रजेवर असून अर्जदार जेजे रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगत सरकारी पक्षाने पुढील तारीख मागितली. यानंतर 8 मे रोजी सुनावणी पार पडली.
पवार यांचे वकील करीम पठाण यांनी असा युक्तिवाद केला की माझ्या अशिलाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यांच्या वैद्यकीय फाईलमधून दिसून आले आहे. तुरुंगाच्या वातावरणात त्याची जगण्याची शक्यता कमी आहे. त्याच दिवशी तक्रारदाराने वकिलाशी संपर्क साधला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मे 2023 रोजी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याचे काम हाती घेतले. परंतु सरकारी वकिलांनी वैद्यकीय जामीनाला विरोध केला. त्यानंतर पुढील आदेशापर्यंत सुनावणी तहकूब झाली. मात्र, 10 मे रोजी न्यायालय इतर प्रकरणांमध्ये गुंतले असल्याने अखेर 11 मे रोजी न्यायालयाने सुरेश पवार यांना वैद्यकीय जामीन मंजूर केला परंतु त्याआधीच म्हणजे 9 मे रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुरेश पवार यांचा मृत्यू झाला होता.
मृत्यूनंतर 2 दिवसांनी आरोपीला न्यायालयाकडून वैद्यकीय जामीन
