उज्जैन – उज्जैनमधील महाकाल मंदिर परिसरात असलेल्या तकिया मशिदीवरआज बुलडोझर फिरवण्यात आला.त्यासाठी मुस्लीम धर्मगुरुंनीच समंती दिली होती.त्यासोबत या परिसरातील बेगमबाग आणि निझामुद्दीन कॉलनीत असलेली २५७ घरेही जमीनदोस्त करुन हा परिसर महाकालच्या भक्तांसाठी मोकळा केला.
महाकाल मंदिर क्षेत्राचे विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणास बेगमबाग आणि निझामुद्दीन कॉलनीतील मशीद आणि घरे अडथळा ठरत होती. याठिकाणचे अतिक्रमण काढण्यासंदर्भातील प्रकरण अनेक वर्षे उच्च न्यायालयात सुरू होते. उच्च न्यायालयाने पाडकामाला मंजुरी दिल्यावर हे अतिक्रमण काढण्यात आले.त्यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश भार्गव यांनी सांगितले की,मशीद हटवण्यासाठी धर्मगुरुंसोबत चर्चा झाली.त्यानंतर त्यांनी मशीदचे सामान काढण्यासाठी वेळ मागितला. प्रशासनाने त्यांना तो वेळ दिला. धर्मगुरुंच्या संमतीनंतर मशीद पाडण्याची कारवाई झाली.
मुस्लीम धर्मगुरुंच्या संमतीने महाकाल मंदिराजवळील मशीद पाडली
