मुस्लिमांच्या मनातील गैरसमज दूर करणार! पानिपतमधील संघाच्या बैठकीत निर्णय

पानिपत -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मुस्लिमांच्या मनात जी भीती आणि गैरसमज आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करायचा, असा महत्वपूर्ण निर्णय आज हरयाणाच्या पानिपत येथील संघाच्या प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

हरयाणा मधील पानिपतच्या समालखाना येथे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळाची तीन दिवशीय बैठक सुरु आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह १४०० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. त्यात विहिंपसह ३४ हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. आज या बैठकीत महिला आणि मुस्लिम समाजावर चर्चा झाली. मुस्लिमांच्या मनात संघाविषयी काही गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या प्रतिनिधींशी संवाद वाढवण्याचा तसेच मुस्लिम समाजाला संघाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम समाजातील काही बुद्धिवादी नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मुस्लिमांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर व्यापक चर्चा करून त्यांच्या मनात हिंदू आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या बाबतीत जे गैरसमज आहेत ते दूर व्हायला हवेत त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्याच बरोबर देशातील सर्व सामाजिक प्रकल्पांमध्ये महिलांचा समावेश करून घ्यावा. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांना जास्तीत जास्त संधी आणि सुरक्षा मिळावी यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाली.

Scroll to Top