मुश्रीफांना दिलासा नाहीच जामीन अर्ज फेटाळला

मुंबई – कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. मात्र याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुश्रीफ यांना कोर्टाने तीन दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे त्यांना 14 एप्रिलपर्यंत अटक करता येणार नाही.
मंगळवार 28 मार्चला दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. तसेच मुश्रीफ यांना पुढील आदेशापर्यंत अटक न करण्याचे
निर्देश ईडीला दिले होते. मात्र आज मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात ईडीकडून छापेमारी तसेच चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करत न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांना दोन आठवडे अटकेच्या कारवाईपासून संरक्षण दिले होते. तसेच सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यास मुभा दिली होती. त्यानुसार मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर 28 मार्चला विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top