पिंपरी- कंपन्यांमधून निघणारे रसायन मिश्रित पाण्यामुळे पिंपरी चिंचवड शहरच्या पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. यावर पिंपरी महापालिका पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आपचे पदाधिकारी रविराज काळे यांनी केला आहे.पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदी पात्रावरील केजूबाई बंधाऱ्याजवळ यापूर्वी देखील लाखो मासे मृत अवस्थेत आढळले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्रात लाखो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील पर्यावरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे काही खासगी कंपन्या मुळा नदीपात्रात रसायन मिश्रीत पाणी सोडत आहेत. त्यामुळे मुळा नदीपात्रातील जलचर जीवन धोक्यात आले आहे. मुळा, पवना आणि इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित होत आहे हे का दिसत नाही? असा सवाल रविराज काळे यांनी उपस्थित केला.
मुळा नदीपात्रातमृत माशांचा खच
