मुंबई- मुंबईत पावसामुळे पूर आला असतांना एका सोसायटीत तब्बल ९ फुटांची भारतीय मार्श मगर आढळल्याने खळबळ उडाली. मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाइफस्टाइल जवळील एका सोसायटीत ही घटना आज सकाळी घडली. या सोसायटीतील नागरिकांना सोसायटीत भली मोठी मगर घुसल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. या घटनेची तातडीने दाखल घेत वनकर्मचारी आणि रेस्क्यू पथकाने मगरीला सकाळी ६.३० च्या सुमारास पकडले.
मुलुंडमध्ये ९ फुटीमार्श मगर आढळली
