बंगळूरू- कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यात दुपारी भोजनादरम्यान मुलांना खाण्यासाठी अंडी दिली जातात. ती अंडी परत घेतल्याप्रकरणी दोन अंगणवाडी सेविकांना निलंबित केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकारणी अधिक चौकशी सुरु आहे.
महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनात अंडी हा अनिवार्य भाग आहे. दोन कर्मचाऱ्यांनी अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या अंड्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि फोटो काढले. व्हिडिओत दिसत आहे की अंगणवाडी सेविकांनी मुलांना जेवणादरम्यान दिलेली अंडी परत घेतली. ही बाब निदर्शनास येताच तात्काळ कोप्पलच्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आणि कोप्पल जिल्ह्याच्या उपसंचालकांना नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या. मुलांना पोषण आहार देणे आणि समतेचे शिक्षण देणे हे अंगणवाडीचे उद्दिष्ट आहे.