मुरुडच्या समुद्र किनाऱ्यांवर परदेशी ‘सीगल’ पक्ष्यांचे थवे

मुरुड -दिवाळी संपल्यापासून मुरुडमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुणे म्हणजे सीगल पक्षी अर्थात समुद्रपक्षी मोठ्या प्रमाणात मुरुडमध्ये दाखल झाले आहेत.या पक्ष्यांना पाहण्यासाठी मुरुडमध्ये पर्यटकांचीही गर्दी होत आहे.ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत या सीगल पक्ष्यांचा मुरुडच्या किनार्‍यावर मुक्काम असतो.

थंडीच्या काळात लडाखमध्ये बर्फवृष्टी झाली की हे पक्षी पुरेसे खाद्य आणि वास्तव्य करण्यास अनुकूल ठिकाणी स्थलांतर करतात.काही दिवसांपासून मुरुडसह राजपुरी, आगरदांडा समुद्रकिनारे सीगल पक्ष्यांचे थवे दिसत आहेत.समुद्रात बागडताना, आकाशात भरारी घेताना सीगल पक्ष्यांचे दृष्य मन हरखून टाकते. समुद्रकिनारी हे पक्षी छोटे मासे,किडे आणि खेकड्यांचा शोध घेत असतात.अशा या गोंडस पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटक येतात.शिवाय स्थानिकांचीही गर्दी होत आहे.पांढरा शुभ्र रंग, पंखावर करडा रंग,लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असे रुपडे असलेल्या सीगल पक्ष्यांचा डौल काही औरच असतो. युरोप तसेच रशियामधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत सीगल पक्ष्यांचे थवे मुरुडमध्ये दाखल झाले आहेत.त्यांच्या आगमनाने मुरुडचा समुद्रकिनारा अक्षरश: फुलून गेला आहे.पांढरा शुभ्र रंग आणि गुलाबी पंख यामुळे सीगल पक्ष्याला ‘अग्निपंख’ असेही म्हटले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top