Home / News / मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रस्त्यांवर खड्डे! वाहनचालकांना अपघाताची भीती

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रस्त्यांवर खड्डे! वाहनचालकांना अपघाताची भीती

ठाणे – रस्ते खड्डेमुक्त करू, नागरिकांना चांगले रस्ते देऊ अशी घोषणा करणाऱे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

ठाणे – रस्ते खड्डेमुक्त करू, नागरिकांना चांगले रस्ते देऊ अशी घोषणा करणाऱे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईजवळ असलेले शहर म्हणून ठाण्यात मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात. या नागरिकांना मुंबईच्या पश्चिम उपनगरात जाण्यासाठी घोडबंदर रस्त्याचा वापर करावा लागतो. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. खड्ड्यांमधून प्रवास करताना दुचाकी चालकांना खड्डे वाचवताना तारेवरची कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता असल्याने हा रस्ता खड्डे मुक्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या