Home / News / मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान केजरीवाल रिकामे करणार

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान केजरीवाल रिकामे करणार

नवी दिल्ली- मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ४ ऑक्टोबरला फ्लॅगस्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करून नवीन घरात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली- मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ४ ऑक्टोबरला फ्लॅगस्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करून नवीन घरात स्थलांतरित होणार आहेत. त्यांना नवी दिल्लीतील मंडी हाऊस भागात नवे घर देण्यात आले आहे. आम आदमी पार्टीने बुधवारी ही माहिती दिली.
केजरीवाल यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री बंगला रिकामे करण्याचा निर्णय घेतला आहे. आपने केंद्र सरकारकडे मागणी केली होती की, केजरीवाल राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख असल्याने त्यांच्या निवसास्थानाची सोय करावी. मात्र, दिल्लीतील आमदारांना सरकारी निवासस्थाने दिली जात नाहीत. केजरीवाल आता फक्त नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, असे सांगून आपची मागणी फेटाळण्यात आली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी नवरात्रीच्या काळात मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करणार असल्याचे सांगितले होते . त्यानुसार ते ४ ऑक्टोबरला मुख्यमंत्री निवासस्थान रिकमे करून नव्या घरात जातील. दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते गाझियाबादच्या कौशांबी भागात रहात होते.

Web Title:
संबंधित बातम्या