Home / News / मुंबै बँकेला भूखंड देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला

मुंबै बँकेला भूखंड देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला

मुंबई – भाजपा आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (मुंबै बँक) गोरेगाव येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला...

By: E-Paper Navakal

मुंबई – भाजपा आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (मुंबै बँक) गोरेगाव येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे.
गोरेगाव पूर्व येथील भूमापन क्रमांक १४-ब मधील १४५ एकर जमीन महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या नावावर आहे. या ठिकाणी सध्या पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे.या जागेतील १२ हजार २५९ चौरस मीटरचा (सुमारे तीन एकर) भूखंड मुंबै बँकेला सहकार भवन उभारण्यासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जुलै महिन्यात घेतला होता.
सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधक या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत होते. त्यामुळे सरकारने माघार घेत भूखंड मुंबै बँकेला देण्याबाबत जारी केलेला शासननिर्णय (जीआर) मागे घेतला.

Web Title:
संबंधित बातम्या