मुंबई – अक्षय्य तृतीयेनिमित्त मुंबईच्या सिध्दिविनायक आणि मुंबादेवी मंदिरात आंब्याची आरास करण्यात आली. सिध्दिविनायक मंदिरात बाप्पाला आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला होता. मुंबईतील अनेक मंदिरांमध्ये अशी आंब्याची आरास करण्यात आली होती. ही आंब्याची आरास पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. भाविकांना प्रसाद म्हणून या आंब्यांचे वाटप करण्यात आले.
मुंबादेवी व सिध्दिविनायक मंदिरात आंब्याची आरास
