मुंबई – दक्षिण मुंबईतील मुंबादेवी ते क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबादेवी ते कॉटन मार्केट या दोन प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.ही अतिक्रमणे हटवून दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले जाणार आहेत.मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की,या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. काही ठिकाणी १५ फूट इतकीही रिकामी जागा शिल्लक राहिलेली नाही.याठिकाणी फेरीवाले,
दुकानदार यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे.त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि पालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. मुंबादेवी परिसराचा विकास करण्यासाठी येत्या ४ दिवसांत निविदा काढली जाणार आहे. महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठीही येत्या दोन दिवसांत निविदा काढली जाईल,अशी माहितीही मंत्री केसरकर यांनी दिली.