मुंबई – मध्य रेल्वे दरवर्षी उन्हाळ्यातील सुट्टीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी विशेष गाड्या विविध भागात सोडत असते. मात्र यंदा उन्हाळी विशेष गाड्यांव्यतिरिक्त १८ विशेष गाड्या मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरातील सुभेदारगंज स्थानका दरम्यान सोडल्या जाणार आहेत. या साप्ताहिक विशेष गाड्या असणार आहेत.
यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ मे ते ३० जून या कालावधीत दर शुक्रवारी ००.१५ वाजता ही विशेष गाडी सुटेल आणि ती दुसर्या दिवशी ५.१० वाजता सुभेदारगंज येथे पोहचेल. तर अशीच एक साप्ताहिक विशेष गाडी ३ मे ते २८ जून या कालावधीत दर बुधवारी सुभेदारगंज येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी ४.१५ वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल.