मुंबई – मुंबईहून नैनितालला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उड्डाण करायला उशिर झाला. त्यामुळे दीड ते दोन तास प्रवासी देखील या विमानात बसून होते. त्यामुळे अखेर प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी विमानाबाहेर पडून विमानाची व्यवस्था कंपनीने करावे या मागणीसाठी धावपट्टीवर बसून ठिय्या मांडला. या आंदोलनामुळे मुंबई विमानतळावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
इंडिगो कंपनीचे विमान आज सकाळी ८ वाजता मुंबईहून नैनितालला जाणार होते. परंतु विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाला दीड ते दोन तास विमान धावपट्टीवरच थांबले. त्यामुळे दीड ते दोन तास प्रवाशांचाही खोळंबा झाला. अखेर प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी विमानाबाहेर पडून पर्यायी विमानाची व्यवस्था कंपनीने करावी या मागणीसाठी रेल्वेवरच ठिय्या मांडला. शेवटी कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सीआयएसएफच्या जवानांना रेल्वेवर पाचारण करण्यात आले आणि या सर्व प्रवाशांना पुन्हा बसमध्ये बसवून विमानतळावर आणले. धावपट्टीवरच प्रवाशांनी आंदोलन सुरू केल्याने यावेळी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली.