मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० जागांसाठी २२ सप्टेंबरला मतदान होणार आहे. १० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात असून भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिवसेना ठाकरे गटाची युवा सेना यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी १३ हजार ४०६ मतदार आहेत. ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बुथनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिनेट निवडणुकीत सर्व जागांसाठी युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात होणार आहे. याशिवाय मनसेचे सचिव सुधाकर तांबोळी यांनी अर्ज भरला असून छात्र भारती संघटनेकडून चार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तर अपक्ष म्हणून चार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. निवडणूकीसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले असून पुढील प्रशिक्षण १९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. ५ सप्टेंबर रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक २२ सप्टेंबरला
