मुंबई- मुंबई विद्यापीठात जागतिक संस्कृती आणि सभ्यता यावर विद्यापीठातील शिक्षकांसाठी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. एक आठवड्याच्या या अल्पकालीन अभ्यासक्रमात पर्शियासह प्राचीन संस्कृतीसह लिथुआनिया स्लोव्हाकिया,रुमानिया आदी देशातील प्राचीन संस्कृती आणि सभ्यतेचा अभ्यास शिकविला जाणार आहे.
या अभ्यासक्रमाचा शुभारंभ नुकताच मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लिथुआनियाच्या राजदूत डायना मिकविसेनी,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रवींद्र कुलकर्णी,प्र. कुलगुरू डॉ.अजय भामरे,प्रमुख वक्ते इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजचे संचालक विजय स्वामी, पुरातत्व विभागाचे प्रभारी डॉ.प्रकाश मसराम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की,प्राचीन संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी आणि मानवी संस्कृतीचे उत्तम आकलन होण्यासाठी या अल्पकालीन अभ्यासक्रमाचे महत्व आहे.