मुंबई –
मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणारी बी फार्मसीच्या आठव्या सत्राची परीक्षा २ व ३ मे रोजी घेतली जाणार होती, मात्र याच दिवशी ३ वर्षांच्या विधी प्रवेशाची सीईटीची परीक्षा होणार असल्याने बी फार्मसीचा पेपर पुढे ढकलण्यात आला. २ व ३ मे रोजी इतर कोणकोणत्या परीक्षा आहेत हे पाहून सुधारित परिपत्रक विद्यापीठ उद्या प्रसिद्ध करणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३- २४ साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विधी ३ वर्षे या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी २ आणि ३ मे रोजी घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षा कक्षाने यापूर्वीचे त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र याच तारखांच्या दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या बी फार्मसीच्या सत्र ८ ची परीक्षाही असल्याने अनेक विद्यार्थ्यांची यासाठी अडचण होईल, असे लक्षात आल्याने विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते अॅड. मातेले यांनी विद्यापीठ आणि सीईटी परीक्षा कक्षाकडे केली. त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून बी फार्मसीची परीक्षा पुढे ढकलण्यात आला.