मुंबई:
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेअंतर्गत ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’ चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून “श्री रामेश्वरम-तिरुपती: दक्षिण यात्रा” भारत गौरव ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन २३ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रवास सुरू करणार आहे. पुन्हा २ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोहोचणार आहे.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेन म्हैसूर, बेंगळुरू, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, रामेश्वरम, मदुराई आणि तिरुपती सारख्या स्थळांचा भेट देईल. प्रवाशांना या स्थानांचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. ही विशेष ट्रेन ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर आणि कलबुर्गी या मार्गे धावणार आहे. म्हैसूर, बेंगळुरू, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, रामेश्वरम, मदुराई आणि तिरुपती या ठिकाणी तिचा थांबा असेल. परतीच्या प्रवासात ही गाडी कलबुर्गी, सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि ठाणे या स्टेशनवर थांबणार आहे. अधिक तपशील www.irctctourism.com वर जाणून घेता येईल.