मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच मुंबई मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे.राज्य सरकारकडून मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.मुंबई, ठाणे, मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी वर्ग केला गेला आहे.
आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरुपात सरकारला मिळाली रक्कम मिळाली आहे.या मेट्रो मार्गांसाठी २७२ कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णयही नुकताच जारी करण्यात आला आहे.
या एकूण २७२ कोटी निधीपैकी मेट्रो-५ मार्गिकेसाठी (ठाणे-कल्याण-भिवंडी) २३.८३ कोटी रुपये,मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा भाईंदर) आणि मार्ग ७ अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रकल्पासाठी २२ कोटी रुपये, मुंबई मेट्रो-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) प्रकल्पासाठी २७.५० कोटी रुपये,मुंबई मेट्रो-४ (कासारवडवली) आणि मेट्रो ४अ (कासारवडवली ते गायमुख) प्रकल्पासाठी ५६.८३ कोटी रुपये,मुंबई मेट्रो २बी (डीएन नगर ते मंडाळे) प्रकल्पासाठी ५३.९० कोटी रुपये,मुंबई मेट्रो २अ (दहिसर पूर्व ते डीएन नगर) प्रकल्पासाठी २७.५० कोटी रुपये आणि मेट्रो लाईन ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) प्रकल्पासाठी ३६.६७ कोटी रुपये एमएमआरडीएला राज्य सरकारकडून वितरीत करण्यात आले आहेत.