मुंबई
‘महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडन)’ (एमएमएमओसीएल)ने मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ साठी प्रवाशांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे मेट्रो प्रवाशांची आता ‘कॉलड्रॉप’पासून सुटका होणार आहे. एमएमएमओसीएलने मेट्रोच्या खांबांवर छोटे आणि सूक्ष्म टेलीकॉम टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे टॉवर उभारण्याचे काम सुरू झाले असून एकूण १५०० खांबांपैकी १२ खांबांवर टॉवर उभारण्यासाठी खासगी दूरसंचार कंपन्यांच्या स्वाधीन केले आहेत.
एमएमएमओसीएलने याबाबत इंडस टॉवर कंपनीसोबत करार केला आहे. या करारामुळे एमएमएमओसीएलला पुढील १० वर्षांत बारा खांबातून १२० कोटी रुपये महसूल मिळणार आहेत. तसेच नेटवर्क कनेक्टीव्हीटी वाढवण्यासाठी एमएमएमओसीएलने छोट्या आणि सूक्ष्म सेलचे धोरणदेखील आखले आहे. यामुळे दूरसंचार कंपन्यांना उपकरण उभारण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, मेट्रो लाईन २ ए आणि ७ वरील ३५ किमी अंतरामध्ये एकूण १५०० खांब आहेत.