मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेलचा एक्झिट मार्ग ६ महिन्यांसाठी बंद

पनवेल- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे ११ फेब्रुवारीपासून ६ महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पातर्गत एमएसआरडीसी नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याचे काम सुरू करत आहे.त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत.ज्यानुसार महामार्गावरून पनवेल, गोवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा (९.६०० किमी) येथे पळस्पे सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्ग-४८वर वळवली जातील. यादरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि तळोजा,कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहनांना १.२०० किमी अंतरावरून पनवेल-सायन महामार्गावर सरळ पुढे जावे लागेल आणि पुरुषार्थ पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली उजवीकडे वळून रोडपाली आणि राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे पुढे जावे लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top