*मुंबई गोवा महामार्गासाठी
१ मे ला वडखळ पासून मोर्चा

रायगड
सरकारने मे पर्यंत पळस्पे ते इंदापूर रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही ३० एप्रिलपर्यत वाट पाहू , तोपर्यंत काम नाही झाले तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनी वडखळ ते नागोठणे असा लॉंगमार्च काढून सरकारचा निषेध केला जाईल असा इशारा ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी दिला आहे..
रायगड प्रेस क्लबचा १८ वा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा पोलादपूर मध्ये पार पडला.. यावेळी अध्यक्षपदावरून एस.एम देशमुख बोलत होते..
कोणी कितीही श्रेय घ्यायचा प्रयत्न केला तरी हा रस्ता केवळ पत्रकारांमुळेच झाला हे जगाला माहिती आहे.. पत्रकार रस्त्यासाठी लढत होते तेव्हा एकाही राजकीय नेत्याने आंदोलनास पाठिंबा दिला नाही अथवा आंदोलनात सहभाग नोंदविला नाही.. कोकणातील सर्वच राजकीय पक्ष मुंबई गोवा महामार्गाबाबत उदासिन असल्याचा आरोप एस.एम देशमुख यांनी केला.. राजकीय नेत्यांना सागरी महामार्ग हवा आहे, कारण नियोजित सागरी मार्गावर राजकीय नेत्यांनी हजारो एकर जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत.. हे राजकीय नेते कोण आहेत याचा शोध रायगडमधील पत्रकारांनी घेतला पाहिजे असे आवाहन देशमुख यांनी केले..
यावेळी बोलताना खा. सुनील तटकरे यांनी, महामार्गास होत असलेल्या विलंबास आम्ही सर्वच राजकीय नेते जबाबदार असल्याची कबुली दिली..

Scroll to Top