चिपळूण – एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने आपल्याला मोबदला मिळेपर्यंत रस्त्यावर बसून आंदोलन केल्याने मुंबई -गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार नाही असा इशाराही या शेतकऱ्याने दिला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे शेतकर्याने हे आंदोलन केले. हा शेतकरी प्रकल्पग्रस्त असून त्याने आपल्याला मोबदला मिळाला नसल्याचे म्हटले. मला मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर बसून राहिन, असे म्हणत रस्ता अडवून धरला. त्यामुळे काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्याची समजूत घातली.