मुंबई गोवा महामार्गावर टँकर उलटला !चालक जखमी

कणकवली – मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. या अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top