रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर गाडीला टोईंग व्हॅनने धडक दिल्याने अपघात झालेल्या अपघातात सूर्यकांत मोरे, साहिल शेलार, प्रसाद नातेकर, समिप मिंडे या चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरून महाडकडून मुंबईला जात असताना वीर रेल्वे स्थानकाजवळ स्कॉर्पिओ जीपमधील डिझेल संपल्याने गाडी रस्त्याकडेला उभी करून गाडीतील सहा जण गाडीशेजारी उभे होते. त्यांना मागून येणाऱ्या टोईंग व्हॅनने धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून पोलीस अपघाताचा पुढील तपास करत आहेत.