मुंबईत २९१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम

मुंबई- पावसाळा संपत आला तरी मुंबई शहर आणि उपनगरात २९१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे. त्यामुळे आता धोकादायक ठिकाणी राहणार्‍या सुमारे २२ हजार रहिवाशांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यानंतर लवकरच संरक्षक भिंती बांधल्या जाणार आहेत. पालिकेकडून यासाठी ११५ कोटी खर्च केले जाणार असून यामध्ये रहिवाशांचे स्थलांतर आणि पुनर्वसन आदी उपायांचाही समावेश आहे.

मुंबईतील २९१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम असून त्यामध्ये सर्वाधिक ठिकाणे कुर्ला ते मुलुंड दरम्यानची आहेत. यातील विक्रोळी-भांडुपमध्ये-१३२, घाटकोपर-३२, देवनार-११, मुलुंड-५, मालाड-५, मलबार हिल-ताडदेव-१६ आदी ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. जिल्हाधिकारी आणि पालिकेनेच ही दरडप्रवण ठिकाणे म्हणून निश्चित केली आहेत. ही ठिकाणे संरक्षित केली जाणार आहेत. यात आवश्यक असेल अशाच रहिवाशांचे स्थलांतर आणि पुनर्वसन केले जाईल. तसेचआवश्‍यक अशा ठिकाणी संरक्षक भिंती उभारल्या जाणार आहेत. हे काम पावसाळ्यानंतर लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top