मुंबई : उत्तर भारतातील रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपूर तसेच पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेनच्या ६२ सेवा मध्य रेल्वेतर्फे चालवण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे .
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर ही विशेष ट्रेन २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी १०.२५ वाजता सुटेल आणि उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. तर २४ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोरखपूर येथून ट्रेन रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०७.२५ वाजता पोहोचेल. ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना , झांसी, उरई, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद येथे ही गाडी थांबेल. या गाडीला २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ सामान व गार्डच्या ब्रेक व्हॅनसह ८ सामान्य द्वितीय श्रेणी (१८ डब्बे) असतील.