Home / News / मुंबईत ‘माझा लाडका खड्डा’ वॉचडॉग फाउंडेशनचे आंदोलन

मुंबईत ‘माझा लाडका खड्डा’ वॉचडॉग फाउंडेशनचे आंदोलन

मुंबई – मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाउंडेशनने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.’माझा लाडका खड्डा’ टी शर्ट परिधान...

By: E-Paper Navakal

मुंबई – मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाउंडेशनने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.’माझा लाडका खड्डा’ टी शर्ट परिधान करून के पूर्व वॉर्डमधील सहार गाव, विलेपार्ले पूर्व येथे रोड क्रमांक १ आणि २ जंक्शनवर निदर्शने करण्यात आली.

वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड.गॉडफ्रे पिमेंटा, निकोलस अल्मेडा,सदस्य ब्रायन परेरा,जोनाथन फर्नाडिस,ब्लेझ मोरेस, आर्थर मिरांडा, विद्यार्थी व रहिवाशांनी आंदोलनात सहभाग घेतला. बोरिवलीतील गोराई शेपाली मार्ग २०२३ मध्ये बांधला.मात्र काही महिन्यांतच मुसळधार पावसामुळे हा रस्ता जागोजागी उखडला आहे. याबाबत स्थानिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. या रस्त्याच्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने
पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या