Home / News / मुंबईत ‘मलावी’ आंबा दाखल! ३ किलोची पेटी ५ हजार रुपयांत

मुंबईत ‘मलावी’ आंबा दाखल! ३ किलोची पेटी ५ हजार रुपयांत

नवी मुंबई – पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा काल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. प्रतिबॉक्स ३ ते ५...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी मुंबई – पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा काल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे.ऐन हिवाळ्यात ग्राहकांना आता आंब्याची चव चाखता येणार आहे.
दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात हा मलावी देशातील आंबा भारतामध्ये विक्रीसाठी येत असतो.नवी मुंबई येथील बाजार समितीमध्ये काल मलावी हापूसचे ९४५ बॉक्स व टॉमी अटकिन्स आंब्याचे २७० बॉक्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत.एका बॉक्समध्ये आंब्याच्या आकाराप्रमाणे १०-२० नग आहेत.तीन किलो वजनाच्या या पेटीला ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळत आहे. बाजार समितीमधून मुंबई क्रॉफर्ड मार्केट फळ बाजार, ब्रीचकँडी,घाटकोपर,माटुंगा,जूहू,पुणे, दिल्ली, अहमदाबाद, राजकोट व इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये हा आंबा विक्रीसाठी पाठवण्यात आला आहे. मलावीमधील शेतकर्यांनी २०११ मध्ये कोकणातून हापूसची रोपे नेली होती. तेथे ४०० एकरमध्ये हापूसची बाग तयार केली.प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये हा आंबा विक्रीसाठी भारतात येतो. त्यासोबत तेथील टॉकी अटकिन्स आंबाही विक्रीसाठी येतो. गेल्यावर्षी जानेवारीपासून कोकणच्या हापूसची नियमित आवक सुरू झाली होती. परंतु यावर्षी कोकणचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या